Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

डॉ. शीतल आमटे यांनी का केले आत्महत्या..?





चंद्रपूर ➡️ ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि विकास आमटे यांच्या कन्या आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शीतल आमटेंनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.

शेवटचे ट्विट चर्चेत आले आहे

शीतल आमटे-करजगी यांनी आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास एक ट्विट केलं होतं. वॉर अँड पीस या शीर्षकासह शीतल यांनी एका ऍक्रेलिक पेटिंगचा फोटो ट्विट केला होता.या ऍक्रेलिक पेटिंगच्या खाली त्यांचं स्वत:चं नाव आणि कालची तारीख आहे. शीतल यांच्या निधनाचं वृत्त येताच त्यांचं शेवटचं ट्विट चर्चेत आलं आहे. अनेकांनी त्यांच्या ट्विट खाली श्रद्धांजली वाहिली आहे. खूप जणांनी त्यांचं ट्विट लाईक आणि रिट्विटही केलं आहे. शीतल आमटेंनी याच पेंटिंगचा फोटो फेसबुकवरदेखील शेअर केला होता. शीतल यांच्या आत्महत्येनं अनेकांना धक्का बसला आहे.




 डॉ. शीतल आमटे यांनी केले होते गंभीर आरोप

अलीकडेच समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आमटे कुटुंबीयानी निवेदन जारी करून शीतल आमटे याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते.त्याचप्रमाणे शीतल यांनी केलेल्या आरोपींबाबत असहमती दाखवली होती. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. आनंदवनमधील वाद आणि तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ व्यवस्थापनाने येऊ देऊ नये. आमटे कुटुबीयांनी स्वतः पुढाकार घेऊन या वादावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. केवळ राज्यच नाही तर देश-परदेशातून अनेकांनी आमटे कुटुंबातील हे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला होता. गेल्या अनेक दशकापासून आनंदवनशी जोडलेल्या राज्यातील अनेक कलावतांनी आमटे कुटुंबियांशी चर्चा करून कौटुंबिक कलह संपावेत यासाठी प्रयन सुरू केले होते.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी 1949 मध्ये या आनंदवनाची स्थापना केली. त्यामुळे संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना याठिकाणी आश्रय मिळाला. बाबांनी त्यांची सेवा केली. त्यांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. मात्र कुष्ठरोग्यांवर उपचार करणारे केंद किंवा रुग्णालय होऊ नये याकडेही बाबंनी लक्ष दिले होते. त्यातूनच त्यांनी कुष्ठरोग्यांच्या श्रमातून औद्योगिक वसाहत उभी केली. त्याचबरोबर साधना आमटे यांनी देखील कष्ट करून दोघांच्या मेहनतीने आनंदवन उभे राहिले. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना स्वयंपूर्ण करून जगायला त्यांनी शिकविले. बाबा आणि साधना आमटे यांच्या निधनानंतर आनंदवनची सूत्रे त्यांचे सुपुत्र विकास आमटे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी काही काळ कारभार साभाळल्यानंतर त्यांचा मुलगा कौस्तुक यांची महारोगी सेवा समितीवर नियुक्ती करण्यात आली. मात्र, मूलगी शीतल आमटे करजगी यांना समितीवर स्थान दिले गेले. आमटे कुटुंबातील वादामुळे मुलाचा कारभार काढून मुलीला सोपविल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.



Post a Comment

0 Comments