Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

तैयब्बा रोटी बॅकेचे आमदार वरपुडकरांच्या हस्ते उदघाटन





परभणी ➡️ शहरातील शाही मजिद परिसरात मनपाचे सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला याच्या पुढाकाराने रोटी बॅकेची स्थापना करण्यात आली या बॅकचे उदघाटन नुकतेच आमदार सुरेश वरपूडकरांच्या हस्ते करण्यात आले.

 गोरगरीबांच्या मदतीला धाावून जाणारे सय्यद समी उर्फ माजुलाला यांनी गोरगरीब नागरिकांसाठी रोटी बॅकेची स्थापना केली.  या ठिकाणी २४ तास गरीबांसाठी  मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या घरातील शिल्लक असलेले अन्न धान्य किंवा जेवन या रोटी बॅकेत जमा करण्याचे आवाहन आ. सुरेश वरपुडकर, नगरसेवक हफीज चाऊस यांनी केले आहे. यावेळी आ.सतीश चव्हाण, आ. डॉ. राहुल पाटील, माजी महापौर प्रताप देशमुख, नगरसेवक हफीज चाऊस , सभागृह नेते  माजुलाला, उपमहापौर भगवान वाघमारे, कॉग्रेसयुवानेते सुरेश नागरे, डॉ. विवेक नावंदर, गुलाम मोहमद मिठू ,समाजभूषन बशीर अहेमद आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांना आ.वरपुडकर, हफीज चाऊस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांना नंबर १ पसंती देवून भरघोस मत देवून विजयी कऱण्याचे  आवाहन केले. कार्यकम यशस्वीतेसाठी सजुलाला मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आभार नगरसेवक इमरान हुसैनी यांनी मानले.




Post a Comment

0 Comments