Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ऊस कापनी यंत्राचा वीजतारेस स्पर्श झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू





परभणी
➡️  उसाची कापणी करताना एका यंत्राचा लोंबकळणार्‍या वीज तारेस स्पर्श झाल्याने दोघांना विजेचा मोठा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे शुक्रवारी (दि.27) दुपारी घडली. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कंठेश्वर (ता.पूर्णा) शिवारातील शेतकरी त्र्यंबक कदम यांच्या शेजारी शेतात शुक्रवारी (एमएच - 22 - एडी -1051) हे ऊस कापणी यंत्राच्या मदतीने अमोल जोगदंड हा ऊस कारखान्यात नेण्यासाठी एका वाहनामध्ये (एमएच 37 बी 1186) भरत होते. हे वाहन चालक कर्‍हाळे हा चालवित होता. या शेतातून 11 केव्हीच्या वीज वाहिन्या गेलेल्या आहेत. ऊस यंत्राव्दारे कापणी केलेला ऊस अमोल जोगदंड वाहनात भरत असताना लोंबकळणार्‍या तारांशी यंत्राचा स्पर्श झाला. विद्युत प्रवाह यंत्रात उतरल्याने अमोल जोगदंड यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहन चालक कर्‍हाळे हे अमोल याच वाचविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने ते दूर फेकल्या गेल्या.

तेथे असलेल्या कर्‍हाळे यांच्या भावाने तातडीने दोघांनाही पूर्णेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच चुडावा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी देवकते, फौजदार पंडीत, जमादार सूर्यकांत केजगीर, प्रवीण टाक आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. माधवराव कर्‍हाळे यांनी दिलेल्या माहितीवरून चुडावा पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





Post a Comment

0 Comments