Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राणीसावरगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न





परभणी ➡️ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात  आली होती. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस गंगाखेड विधानसभेचे अध्यक्ष कृष्णा भैय्या दळणर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

    गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रितेश काळे, गंगाखेड विधानसभेचे अध्यक्ष कृष्णा भैय्या दळणर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मायदळे, परभणी शहर अध्यक्ष किरण तळेकर, तालुका उपाध्य अल्ताफ सय्यद, प्रदीप भोसले, प्रभाकर सातपुते, सचिन भोसले, पंचायत समितीचे सदस्य दत्ता जाधव, ओंकार आंधळे, सुदर्शन बनसोडे, राम भंडारी, संतोष देशमुख, प्रदीप पवार, गणेश निरस, सचिन भोसले, साबणे, चौधरी आदींची उपस्थिती होती.  यावेळी रितेश काळे, दत्ताभाऊ मायदळे, कृष्णा दळणर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशनराव नाईक यांनी केले तर आभार तानाजी कदम यांनी मानले.




Post a Comment

0 Comments