Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अतिवृष्टींच्या यादीतून डावलल्याच्या निषेधार्थ जांब ग्रामस्थांची धरणे





परभणी ➡️ तालुक्यातील जांब महसुल मंडळाचा अतिवृष्टीच्या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्यासह ग्रामस्थांनी गुरुवार पासून (दि.29) धरणे आंदोलन केले.

परभणी तालुक्यातील परभणी, सिंगणापूर, पिंगळी या तीन मंडळांचे अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु जांब मंडळास हेतुपुरस्सर डावलण्यात येत असल्याचा आरोप श्री. रेंगे यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परभणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस् झाला. या अतिवृष्टीत जांबसह परिसरातील 17 गावांतील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. 

यात जांब, मांडाखळी, बाभुळगाव, उजळंबा, ब्राह्मणगाव, सोन्ना, कवडगाव, तरोडा, पारवा, मोहपुरी, पान्हेरा, पिंपळगाव ठोंबरे, भोगाव, गव्हा, ब्रह्मपुरी तर्फे ब्राह्मणगाव व पेडगाव शिवारातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, तूर, तीळ, ऊस, मूग, उडीद या खरीप हंगामातील पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जांब मंडळातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत तातडीने मिळवुन द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

जिल्हा परिषद सदस्य श्री. रेंगे यांचज्यासह प्रताप नारायणराव रेंगे, दीपक उमाजी लाड, अकबर पाशामियाँ पठाण, बळीराम रेंगे, मनिष यादव, सरपंच गणेश दळवे, जिलानी भाई, भीमराव मोगले, नरहरी ढगे, कैलास टेकाळे, राजेश रेंगे, रामभाऊ दळवे, मारोतराव डुकरे, कल्याण लोहट, दादाराव कांबळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.




Post a Comment

0 Comments