Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आमदार व जिल्हाधिकारी यांनी केली बैलगाडीतून पिक नुकसानीची पाहणी





परभणी ➡️ पालम तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने खरीपातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी रविवारी (दि.27) गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आ. डाॅ. रत्नाकर गुट्टे व जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केली. 

पालम तालुक्यात आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तर काही भागात तर ढग फुटीसारखा पाऊस झाला. यामुळे शेतात पाणी जाऊन  सोयाबिन, कापुस, ज्वारी आदि  पिके पाण्यामुळे सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुकुटीला आला आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्यांकडून पंचनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे व जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली. यासाठी शेतात सर्वत्र पाणी असल्याने त्यांनी थेट बैलडागाडीतून प्रवास करत थेट शेत गाठले. तालुक्यातील रावराजूर येथील शिवारात त्यांनी शेतकर्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. शेतकर्यांसोबत चर्चा केली. शेतकर्यांना धीर दिला. त्यांच्या सोबत तहसीलदार ज्योती चव्हाण, महसुल प्रशासनाचे अधिकाऱ्यांची उपस्थित होते.



 



Post a Comment

0 Comments