Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आज महसूल कर्मचारी जाणार सामूहिक रजेवर




परभणी
➡️ महसूल विभागातील अव्वल कारकून नायब तहसीलदार यांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. महसूल कर्मचारी संघटनेने पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतल्या जात नसल्याने गुरुवारी (दि. एक) मराठवाड्यातील सर्व महसूल कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार असल्याची माहिती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी दिली.
 
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना संघटनेने एक निवेदन देत दिले आहे. मराठवाडा विभागातील अव्वल कारकुन कर्मचा-यांना नायब तहसीलदार व नायब तहसीलदार यांना तहसीलदार पदी पदोन्नती देण्याबाबत वारंवार मागणी करूनही याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात येत नाही. 2018 पासून याबाबत बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे पदोन्नतीचा मार्ग रखडला आहे. याबाबत त्वरित बैठक घेऊन पदोन्नतीपासून वंचित कर्मचा-यांना न्याय देण्यात यावा. मंत्रालय स्तरावर समन्वय साधत मराठवाडा विभागातील सर्व संवर्गास पदोन्नती द्यावी. याशिवाय फौजदारी प्रकरणातील आरोपी संशयित अधिकारी कर्मचा-यांना चौकशी निर्णयाच्या अधीन राहून नैसर्गिक द्यावी, यासह अन्य मागण्यांबाबत महसूल विभागातील सर्व कर्मचारी गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.






Post a Comment

0 Comments