Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सख्या चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू , एकजण म्हशीच्या शिंगाला पकडून आला बाहेर





नांदेड
➡️  लोहा तालुक्यातील कौडगाव येथे म्हशी धुण्यासाठी डोहात उतरलेल्या दोन शाळकरी सख्या चुलत भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. तर अन्य एकजण म्हशीच्या शिंगाला पकडून बाहेर सुखरूप आला.

प्राप्त माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कौडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गौतम गणपती जोंधळे यांचा मुलगा प्रविण गौतम जोंधळे (8) व रोहिदास गणपती जोंधळे यांचा मुलगा शुभम रोहिदास जोंधळे (8) हे सख्खे चुलत भाऊ जि.प. प्राथमिक शाळेत कौडगाव येथे दुसऱ्या वर्गात शिकत होते. मात्र सध्या कोरोनाचा संसर्गामुळे शाळा बंद असल्याने दोघे भाऊ म्हशी घेऊन चारायला शेतावर गेले होते. 10 वर्षाचा राहूल गौतम जोंधळे हा मोठा भाऊ पण होतो. जवळच पाण्याचा डोह असल्याने पाणी पिण्यासाठी म्हशी पाण्यात गेले. त्यानंतर प्रविण, शुभम व राहुल हे तिघे म्हशी धुण्यासाठी डोहात उतरले.

पाणी खोल असल्याचा अंदाज न आल्याने प्रविण व शुभम गटांगळ्या खाऊ लागले आणि बुडाले. तर राहुल म्हशीच्या शिंगाला पकडून सुखरूप बाहेर आला. आरडाओरडा ऐकुण स्थानिकांनी धावाधाव करत दोघा चिमुरड्यांंना बाहेर काढून तातडीने नांदेड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा विष्णुपुरी येथील रूग्णालयात डॉक्टरांनी तपासणी नंतर मृत्यू झाल्याचे सांगितले.




Post a Comment

0 Comments