Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रातील कोरोना योध्यांचा सत्कार




परभणी ➡️ राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज शनिवार दि.29 ऑगस्ट रोजी कोरोना संकटात गेल्या दोन महिन्यापासून समाजासाठी कार्य करणा-या क्रीडा क्षेत्रातील कोरोना योध्यांचा गौरव करण्यात आला.
       जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा शारिरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार, महासंघाचे अध्यक्ष रणजीत काकडे, सचिव कैलास माने यांची उपस्थिती होती. यावेळी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक काकडे यांनी केले.
    यावेळी कोरोनो योध्दे सुशिल देशमुख, विजय गारकर, विजय तिवारी, प्रा.डॉ. पांडूरंग रणमाळ, सय्यद शकील, सय्यद नोमान, शिवाजी खुणे, सुशिल जोरगेकर, प्रमोद लाटे, मोहम्मद मुस्साविरोद्दीन, पांडूरंग अंभोरे, नरेंद्र मुठा, सरिता येलपुल्ला, सुरज सोळंके, श्रीकृष्ण शिंदे, विनीत रणमाळ यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तर खेलो इंडियासाठी निवड झालेली बॉक्सर मोनाली धनगर, श्री. भालशंकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी पी.एस. चव्हाण यांनी केले. क्रीडा अधिकारी शैलेंद्र गौतम यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी रमेश खुणे, निरज नाईकवाडे आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास धनंजय बनसोडे, माधव शिंदे, राजेश शहाणे, माणिक कदम, कैलास टेहरे आदींची उपस्थिती होती.





Post a Comment

0 Comments