Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पोलिस वसाहतीतच घऱफोडी , एक लाख 38 हजाराचा ऐवज लंपास




परभणी  ➡️  येथील जिल्हा पोलिस मुख्यालय परिसरातीलच पोलिस वसाहतीतील एका पोलिस कर्मचार्‍याच्या घरीच चोरट्यांनी घरफोडी करीत एक लाख 38 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
        कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींचे घर साफ करण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावल्याने पोलिस यंत्रणा आधीच अक्षरशः चांगलीच हैराण आहे. आता कहर म्हणजे चोरट्यांनी थेट पोलिस वसाहतीतच तेही पोलिस कर्मचार्‍याच्याच घरावर डल्ला मारला आहे. परभणी येथील पोलिस वसाहतीत सुरेश भारती हे पोलिस कर्मचारी कुटूंबियांसह राहतात. भारती हे पाथरी येथे कार्यरत असुन त्यांचे कुटूंबिय बाहेरगावी गेले होते. घरास कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी केली. या घरफोडीत 45 हजार नगदी रुपयांसह एक लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे  भारती यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.






Post a Comment

0 Comments