Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 112 कोरोनाबाधितांची भर, 03 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 37 जण कोरोनामुक्त





परभणी ➡️ जिल्ह्यात 31 आॅगस्ट रोजी सांयकाळी 07 वाजता प्राप्त अहवालानुसार दिवसभरात आज 112 जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. तसेच आज 03 कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि 37 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाले एकूण संख्या 118 झाली आहे. आजपर्यंत 02 हजार 590 रुग्ण पाॅझिटिव्ह निघाले आहे. आजपर्यत 01हजार 18  कोरोनामुक्त झालेले आहे.
03 कोरोनाबाधितांचा मृत्यू -  

पाथरी तालुक्यातील गुंज येथील 70 वर्षीय पुरूष, पूर्णा शहरातील शहाजी रोडवरील 56 वर्षीय पुरूष, परभणी शहरातील रोशन खान मोहल्यातील 90 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.


37 कोरोनामुक्त रुग्णामध्ये - 

सोनपेठ 1, जिंतूर शहर 8, जिंतूर ग्रामीण 3, परभणी शहर 18, परभणी ग्रामीण 2, सेलु 1, सेलु ग्रामीण 2, मानवत शहर 1, मानवत ग्रामीण 1 असे एकूण 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


112  कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये -  

पूर्णा शहर 3, पूर्णा ग्रामीण 1, मानवत 5, सेलु ग्रामीण 1, पाथरी ग्रामीण 9, पाथरी शहर 1, जिंतुर शहर 8, जिंतूर ग्रामीण 11, सोनपेठ 3, सोनपेठ ग्रामीण 1, गंगाखेड 3, पालम ग्रामीण 1, परभणी शहर 59, परभणी ग्रामीणमधील 6 रूग्णांचा समावेश आहे.




Post a Comment

0 Comments