Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

11 दिवसांत धाडसी चोरीची उकल काढण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश




परभणी ➡️ घरी कोणी नसल्याचे पाहून धाडसी चोरी करणा‍या आरोपीचा छडा केवळ आकराच दिवसात लावून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला गंगाखेड ठाण्यात हजर केले.
    गंगाखेड शहरातील मन्नाथ नगर भागातील संजय भानूदास केंद्रे हे घरी सोमवारी (ता.10) मध्यरात्री नसताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी घरात प्रवेश केला होता. घरात असलेले कपाट तोडून कपाटातील दागीने व रोख रक्कम असे मिळून एक लाख ९४ हजारांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. तसेच घरात असलेली दुचाकीचेही हँडल लॉक तोडून ती चोरण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार गंगाखेड पोलीस ठाण्यात संजय केंद्रे यांनी दाखल केली होती.
    या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश्‍वर आलेवार यांच्या पथकाने फिंगर प्रिंट विभागातील एम.एन. पठाण यांच्या विशेष परिश्रमातून अल्पावधितच या घटनेतील आरोपींचा शोध घेतला. वसमत येथील साखर कारखाना परिसरात राहणारा लखन भिमराव एरंडकर या आरोपीला ताब्यात गुन्ह शाखेच्या पथकाने ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी गंगाखेड पोलीस ठाण्यात हजर केले. पोलीस निरीक्षक व्यंकटेश्‍वर आलेवार, फिंगर प्रिंट विभातील एम. एन. पठाण, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारूखी, शंकर गायकवाड व अरूण कांबळे आदि पोलीस कर्मचार्‍यांनी मिळून ही कार्यवाही केली.




Post a Comment

0 Comments