Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

दोन युवकांकडून एक देशी पिस्तुल जप्त





नांदेड, दि.26 जुलै:- वजिराबाद पोलिसांनी दोन युवकांकडून एक देशी पिस्तुल व इतर हत्यार जप्त केले. त्या आरोपी न्यायालयाने 28 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार वजिराबाद पोलिस ठाणेचे सहाययक पोलिस निरिक्षक सुनिल पुंगळे यांची तक्रारीनुसार 25 जुलै रोजी मध्यरात्री नगीनाघाट ते बंदाघाट या रस्त्यावर अर्थात नदी शेजारी असलेल्या रस्त्यावर संशयीतरित्या फिरणारे दोन युवकांना त्यांनी पकडले. त्यांचे नावे विरसिंघ उर्फ विरा गुरूदेवसिंघ तीवाना 23, व जगजितसिंघ जसपालसिंघ सोढी असे आहे. त्याकडून एक गावठी प्रकारचे पिस्तुल, खंजीर आणि इतर हत्यार जप्त केले. त्यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments