Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

रक्षाबंधन सणानिमित्त राखी टपाल बुकींगची विशेष व्यवस्था




परभणी, दि.30 जुलै :- रक्षाबंधन सणानिमित्ताने यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्रातील डाकघरात  राखी टपाल बुकींग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व डाकघरातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोस्ट सर्कलने रविवार दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी सर्व वितरण पोस्ट कार्यालयामध्ये राखी टपालाची विशेष व्यवस्था केली आहे. रक्षाबंधनाचा सण यावर्षी अधिक महत्वाचा आहे, कारण त्याच शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधामुळे या सणानिमित्त भेट घेणे शक्य होणार नाही. या कोव्हिड-19 विषाणूच्या काळात पोस्ट विभागाने राखी टपाल संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे आणि ‘स्पीडपोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल.’ अशा घोषवाक्याने आनंद देण्याची टपाल विभागाची इच्छा आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरु करण्यात आले आहेत. असे परभणी विभागाचे डाकघर अधिक्षक यांनी कळविले आहे.





Post a Comment

0 Comments