Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, 02 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू




परभणी, दि.30 जुलै :- शहरासह जिल्ह्यात 21 व्यक्ती गुरूवारी कोरोनाबाधित आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने अधिकृतरित्या प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे दिली आहे.त्यामध्ये पाथरी येथील कोमटी गल्ली 45 वर्षीय पुरूष, गंगाखेड येथील पोस्ट ऑफीस जवळील 72 वर्षीय महिला, नगरेश्‍वर गल्लीतील 26 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय पुरूष, पोस्ट ऑफीस जवऴील 82 वर्षीय पुरूष, भाग्य नगरातील 45 वर्षीय महिला, परभणी शहरातील कुर्बान अली शहा नगरातील 63 वर्षीय पुरूष, मानवत तालुक्यातील मानोली येथील 65 वर्षीय पुरूष, गंगाखेड येथील नवा मोंढयातील 39 वर्षीय पुरूष, गंगाखेडातील नगरेश्‍वर गल्लीतील 52 वर्षीय महिला, परभणीतील गुलशनाबाग मधील 40 वर्षीय पुरूष, गंगाखेडातील नवा मोंढ्यातील 50 वर्षीय पुरूष, परभणी येथील त्रिमुर्ती नगरातील 56 वर्षीय महिला, परभणीतील नवा मोंढयातील 75वर्षीय पुरूष, गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा 37 वर्षीय पुरूष, गंगाखेडातील 55 वर्षीय महिला, गंगाखेडातील खडकपुरातील 53 वर्षीय पुरूष, परभणीतील कालाबावर मधील 49 वर्षीय महिला, दत्तनगरातील 72 वर्षीय पुरूष, गंगाखेडातील पोस्ट ऑफीस जवळील 11 वर्षीय पुरूष तसेच जालना जिल्ह्यातील मंठा येथील 28 वर्षीय महिला पॉझिटीव्ह आढळली आहे.
02 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू-
गंगाखेड येथील एका 32 वर्षीय कोरोंनाबाधीत व्यक्तींचा परभणीतील खाजगी रूग्णालयात गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. रुग्णालयात या व्यक्तीने आजाराच्या निमित्ताने तपासणी केली, असता ती व्यक्ती कोरोंनाबाधीत आढळली. त्यामुळे कुटूंबियांनी खाजगी रूग्णालय गाठून उपचार सुरू केले होते.या दरम्यानच या व्यक्तींचा मृत्यू झाला.अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. परभणी शहरातील मध्यवस्तीतील कालाबावर परिसरातील 44 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान गुरूवारी मृत्यू झाला.



Post a Comment

0 Comments